विमा कामगार सहकारी बँक मर्यादित दि. 10 ऑक्टोबर 1960 रोजी स्थापन झाली. कॉम्रेड डी. जी. सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवन विमा निगम कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकरता जीवन विमा निगम कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, या संस्थेची स्थापना केली.
त्यानंतर, सर्वसाधारण विमा कर्मचारीदेखील सदस्य म्हणून या बँकेमध्ये सामील झाले आणि 1981 साली बँकेचे नाव बदलून “विमा कामगार सहकारी बँक, मर्यादित” असे ठेवण्यात आले. नोकरदार व्यक्तींची सहकारी बँक या नात्याने बँक भारत सरकारच्या अधीन असलेल्या विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवा पुरवत आहे.
या क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील बँक सेवा पुरवते. नफा मिळवणे हे आमचे एकमेव ध्येय नसून आमचा भर आमचे सदस्य व त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व अन्य गरजा पुरवण्यावर आहे.